सैनिक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबुराव कविटकर यांची निवड

तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिरसाट बिनविरोध

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हयात अग्रगण्य असलेली सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. सभेच्या सुरवातीस पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सदर संस्थेच्या सर्व सभासदांनी एकोप्याचे दर्शन घडवत निवडणुक बिनविरोध करण्याच्या दृष्टिने एक चांगला धोरणात्मक निर्णय घेतला व एकमेकांच्या सन्मवयाने सदस्य निवड करण्यात आली. मा. अध्यासी अधिकारी अनिल क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलया सभेत चेअरमन पदी बाबुराव अर्जुन कविटकर व व्हा. चेअरमन पदी चंद्रकांत दाजी शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पिटर फ्रान्सिस डान्टस यांनी नुतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले.
यावेळी अध्यासी अधिकारी श्री. अनिल क्षिरसाग, सहकार खात्याचे अधिकारी श्री. राजन आरावंदेकर व संस्थेचे नुतन संचालक श्री. दिनानाथ लक्ष्मण सावंत, श्री. हिंदवाळ भगवान केळुसकर, श्री. सुभाष कुडाजी सावंत, श्री. भिवा वावाजी गावडे, श्री. चंद्रशेखर शिवराम जोशी, श्री. शामसुंदर पांडुरंग सावंत, श्री. संतोष वसंत मुगळे, श्री. वावु शिदु वरक, श्री. शांताराम जयराम पवार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल बाबु राऊळ उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अधिकारी व कर्मचा-यांनी पदाधिका ऱ्यांचे अभिनंदन केले.