रत्नागिरी | प्रतिनिधी : बुधवारी दि.१५ बुधवार २०२३, रोजी रत्नागिरी दक्षिण भा.ज.पा. च्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक रत्नागिरी येथे होणार आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य, मंडल अध्यक्ष, सर्व निर्वाचित सरपंच, नगरसेवक असे १२१ सदस्य निमंत्रित असून ३ महिन्यानंतर होणाऱ्या या जिल्हा बैठकीसाठी लोकसभा प्रमुख प्रदेश चिटणीस संदीप लेले व जिल्हा प्रभारी प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी उपस्थित राहणार आहेत.
बुथ सक्षमीकरण, युवा वॉरियर्स, फ्रेंड्स ऑफ बीजेपी या उपक्रमांना गतिमान करण्यासाठी व्यूहरचना उद्याच्या बैठकीत होईल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका संदर्भात चर्चा राजकीय ठराव तसेच संघटनात्मक जबाबदाऱ्या संदर्भात उहापोह या जिल्हा बैठकीत होईल.
जिल्हा बैठक दि.१५ फेब्रुवारी २०२३, बुधवार रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होऊन भोजनोत्तर संपेल.
जिल्हा बैठकीचे आयोजन रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे सभागृहात जयस्तंभ रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. या महत्वपूर्ण जिल्हा बैठकीला सर्व निमंत्रित सदस्यांनी वेळेवर व पूर्ण वेळ उपस्थित रहावे असे सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी म्हटले आहे.