माजी खासदार निलेश राणे यांची ‘त्या’ विषयावर प्रतिक्रिया ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी सत्त्याचाच आधार घेऊन बोलतात हे ही केले स्पष्ट
मालवण | प्रतिनिधी : पवार कुटुंब किती ढोगी आहे हे महाराष्ट्राला चांगलं माहीती आहे. त्यामुळे सुसंस्कृतपणाचा कुठलाही दाखला सन्माननीय शरद पवार साहेबांनी देऊ नये. अशी स्पष्ट भूमिका भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मालवण येथील निलरत्न निवासस्थानी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला होता. असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एका कार्यक्रमात केला. या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत व सभ्य माणूस आहेत. असे असताना अश्या प्रकारे असत्याचा आधार घेऊन ते बोलतील असे मला कधी वाटले नव्हते. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीत प्रतिक्रिया दिली.
सुसंकृत पणाचा कुठलाही दाखला शरद पवार साहेबांनी देऊ नये. ते तुमच्या तोंडी शोभत नाही. तुम्ही किती जनांची घरे फोडली, कीती खालच्या थराचे राजकारण केल, तुम्हाला ज्यांनी साथ दिली त्यांच्या पाठीतच तुम्ही खंजीर खुपसलात. पवार साहेब हे महाराष्ट्र विसरणार नाही. तुम्ही जे बोलता त्याच्या भलतच काही तरी करत असता. हे महाराष्ट्राला माहीती आहे. म्हणून आपण सुसंस्कृत पणाचं कोणतही वक्तव्य करू नये. महाराष्ट्र आपल्याला ओळखून आहे. पवार कुटुंब किती ढोगी आहे हे महाराष्ट्राला माहीती आहे. अशी प्रतिक्रीया निलेश राणेंनी दीली आहे. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्त्याचा आधार घेऊनच नेहमी बोलतात. असेही निलेश राणे म्हणाले.
विनायक राऊतचे मानसिक संतुलन बिघडले
विनायक राऊतचे मानसिक संतुलन बिघडले आहे. नार्को टेस्ट करण्याची गरज आहे. काय खरे काय खोटे हे स्पष्ट होईल. महाराष्ट्राला कळेल हा बिनकामाचा माणूस आहे. अशी रोखठोक प्रतिक्रिया माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.