गावखडी l वार्ताहर : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील जागृत देवस्थान भगवतीदेवीचा यात्रोत्सव बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या यात्रोत्सवात निमित्त या दिवशी देव्हारा मध्ये भगवती देवीचे मुखवटे लावून देव्हारा भक्तगणां च्या दर्शनासाठी भक्तीमय वातावरणात मंडपात आणला जातो.
त्याचप्रमाणे या दिवशी भूतेवाडीतील महिलामंडळातर्फे दुपारी 3 वाजता हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला असून विविध स्पर्धा , भूतेवाडी भावकीतर्फे रात्रौ 12 वाजता भगवती देवीचा गोधळ घातला जाणार आहे.
या यात्रोत्सवाची सांगता दुसर्या दिवशी सकाळीच ठिक अकरा वाजेपर्यंत केली जाते.या सर्व कार्यक्रमाचा व भगवती देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीभगवती देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भगवतीदेवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने केले जात आहे .या यात्रोत्सवात
लागणारे पूजा साहित्य, देवीची ओटी ,खेळणी ,प्रसाद, विविध खाद्यपदार्थ दुकाने व्यापारी थाटतात.










