बांदा l प्रतिनिधी : बांदा रेस्ट हाऊस मधील विहिरीत एका वृद्धाने गळफास लावून आज सकाळी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. नारायण विठ्ठल ठाकर (५६, रा. वाफोली बांदा) असे त्यांचे नाव आहे.
गेली अनेक वर्षे ते सामाजिक कार्यकर्ते गुलजार खान यांच्याकडे कामाला होते. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र कुडतरकर, पोलीस हवालदार राजेश गवस यांनी घटनेचा पंचनामा केला. बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. सारंग यांनी शवविच्छेदन केले. बांदा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











