एडगांव येथील रामेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

आमदार नितेश राणे यांची कार्यक्रमात उपस्थिती

वैभववाडी l प्रतिनिधी :      श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना साहळ्यानिमित्त एडगांव येथील श्री रामेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी कणकवली, वैभववाडी व देवगड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांनी एडगांव येथील कार्यक्रमात सहभागी होत दर्शन घेतले.

यानिमित्ताने मंदिरात पूजा, मंत्रपुष्पांजली, भजन, अभिषेक, लघुरुद्र, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने रामभक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, वैभववाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, एडगांव सोसायटीचे चेअरमन सुनील रावराणे, राजू पवार व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.