भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार
कुडाळ | प्रतिनिधी
इतिहासात मोठे महत्त्व असणाऱ्या आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती धूमधडाक्यात या वर्षापासून साजरी होणार असल्याने या ठिकाणी जयंती होण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांचे जनतेच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ येथे राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरपंचायतीचे भाजपा गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, सचिन तेंडुलकर, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी तेली यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासात आग्र्याला महत्त्वाचं स्थान आहे. आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व्हावी या करीता विविध संस्थांनी अनेक वेळा प्रयत्न केले होते. पण पुरातत्व खात्याने परवानगी दिली नाही. यावेळी सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आणि वेगळ्या संस्थानी परवानगी मागितलेली त्याला पण पुरातत्व खात्याने नकार होता. परंतु आता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शिवजंयती साठी परवानगी द्या अशा सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता आग्रा किल्ल्यात पहिल्यादांच शिवजयंती धुमधडाक्यात साजरी होणार असुन महाराष्ट्र सरकार सह आयोजक आहेत. या शिवजंयतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री, भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या आग्रा किल्ल्यामधील दिवाणी आम मध्ये औरंगजेबा समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो बाणेदारपणा दाखवलेला होता त्याच दिवाणी आमध्येच छत्रपतींची 393 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.