कुणकेरी हरिजनवाडी ते माडखोल तलाव रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपजन

सावंतवाडी । प्रतिनिधी :
कुणकेरी गावामध्ये गेली २५ वर्षे रखडलेल्या कुणकेरी हरिजन वाडी ते माडखोल तलाव रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मा ना. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून १ कोटी ६७ लाख निघी मंजूर करण्यात आला आहे.
या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष बाळू देसाई , माजी सभापती प्रमोद सावंत, संजना सावंत, प्राजक्ता केळुस्कर, आंबेगाव सरपंच शिवाजी परब, कोलगांव उपसरपंच दिनेश सारंग, प्रमोद गावडे, सुनिल परब, संदीप हळदणकर, योगेश गवळी, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर,ज्ञानेश्वर परब, रमेश गावडे यांसह स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.