न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनी कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत राष्ट्रीय एकात्मेस प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.केरळ राज्याची खाद्यसंस्कृती जाणून घेण्यासाठी चिपळूण शहरातील मुथप्पन मंदिराला भेट देण्यात आली. यावेळी केरळवासी सौ.सुलोचना बाबू मॅडम इंग्लिश मीडियम स्कूल लवेल खेड यांनी विद्यार्थ्यांना केरळ संस्कृती, सांस्कृतिक वारसा, भाषा, प्राकृतिक रचना, प्रसिद्ध पर्यटन स्थळे, प्राणी जीवन, वनसंपदा, मंदिरातील ऐतिहासिक कथा, रीती रिवाज परंपरा, खानपान, पेहराव, कृषी क्षेत्र, मल्याळम भाषा इत्यादी विषयी विद्यार्थ्याना सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच मंदिराचे ट्रस्टी श्री.वलसन सर यांनी केरळ मंदिर विविध उत्सव, प्रसिद्ध ठिकाणे, मोठी शहरे, युद्ध कला याविषयी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शकांना प्रश्न विचारले व आपल्या शंकांचे निरसन केले.तसेच केरळचा सांस्कृतिक वारसा, तेथील संस्कृती रीती रिवाज लक्षात घेतले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांनी उपस्थित व्याख्याते सौ.सुलोचना बाबू व सोशल वर्कर श्री.वलसन सर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.योगेश नाचणकर यांनी केले.तसेच श्री.मिलिंद यादव यांनी आभार मानले.
केरळ राज्यातील प्रसिद्ध शाकाहारी पदार्थ इडली,अप्पम,आमटी,वडा, चटणी,पायसम,रस्सम,खीर इ पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आणले व या खानपानाचे प्रदर्शन भरविण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष श्री.वलसन सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष श्री.नाईक सर,प्रसिद्ध उद्योजक,व्यावसायिक, मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर,उपमुख्याध्यापक श्री.विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील, श्री.मिलिंद यादव,श्री.धनंजय राजेशिर्के,सौ.स्मिता चाळके उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री.योगेश नाचणकर यांनी केले.












