गुहागर | प्रतिनिधी : गुहागर शहरातील दिव्यांगांसाठी शासनाच्या मिळणाऱ्या योजनेच्या माहितीसाठी लवकरच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिले आहे.
ते गुहागर शहर अपंग संस्थेची सर्वसाधारण सभा शहरातील जीवन शिक्षण शाळा नंबर एक मध्ये आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी बेंडल म्हणाले की, दिव्यांगांना स्वावलंबन जीवन जगणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या असणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. गुहागर नगरपंचायती मधील घरपट्टी व पाणीपट्टी कर मिळत असतो त्यातील पाच टक्के निधी हा येथील दिव्यांगांसाठी वापरला जात असल्याचे सांगितले. तसेच या संस्थेचे कार्य व्यवस्थित सुरळीत चालू राहावे म्हणून आपले नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संगीता हळदणकर यांनी सांगितले की, या संस्थेतील दिव्यांगांचे काही समस्या आहेत त्यासाठी एप्रिल मध्ये एक सभा आयोजित केली जाईल. तसेच संस्थेच्या सर्व सभासदांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे व नोकरी विषयी आवश्यक असणारे कागदपत्रे नेहमीच आपल्याकडे तयार ठेवावेत असे सांगितले.
या कार्यक्रमाला गुहागर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मंदार गोयथळे ,भरत कदम ,बाळा लोखंडे, दिलीप गोयथळे, किशोर गोयथळे ,प्रशांत रहाटे आदींसह दिव्यांग व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन भरत कदम यांनी केले.