गिरणी कामगार मुलाची यशस्वी गाथा
संतोष कुळे | चिपळूण : जीवनामध्ये कोणताही व्यक्ती हा त्याच्या कर्तुत्वाने मोठा होत असतो. परिस्थिती कशी ही असो. त्यावर मात करून यशाचे शिखर गाठतो. असच एक व्यक्तिमत्व ज्यांनी संघर्षातून स्वतच्या जीवनाला आकार दिला आणि दुसऱ्यांचे जीवन फुलविण्यासाठी धडपड असणारे दीपक काळिंगन हे सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ आहेत.
दिपक काळींगण यांचा जन्म २३ जुलै १९७५ रोजी मुंबईत अत्यंत गरीब कुटुंबात झाला. वडील यशवंत काळींगण गिरणी कामगार, टाटा मिल हिंदमाता येथे कामाला होते. सगळे कुटुंब धारावीत रहात होते. दिपकला घरून ६ भावंडे . त्यात मोठा भाऊ दीपक, पण गिरणी कामगारांच्या संपामुळे दिपकवर घरची जबाबदारी पडली. त्यावेळी त्याचे वय १२ ते १३ वर्षे होते. प्रथम त्याने सहावीत असताना कलर कंपनीत नोकरी पत्करली. त्यावेळी चार रुपये रोज होता. सकाळी शाळेत जायचे व दुपारी १ नंतर शाळेतून आल्यानंतरच १.३० ते ९.३० कामाला जायचे असा त्याचा दिनक्रम असे. त्यांना २४ रुपये पगार यायचा.
त्यानंतर दिपक ने सुपर मॅक्स बेल्ड कंपनीत काम सुरू केले. मल्होत्रा हाऊस येथे सेल्समन काम करता करता ते सुपरवायझर झाले. १९८० साली धारावीत होणारे दांगलमय वातावरण आणि मारामारी बघून त्याच्या वडीलांनी धारावी सोडून शिवडीत घर घेतले. धारावीत रात्री अपरात्री फिरण्याची कोणाची हिंमत नव्हती. यावेळी लोकांना मदत करण्याची त्यांना सवय लागली
शिक्षण घेत असतानाच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आ. वामनराव महाडीक यांच्या बरोबर काम केले. ते त्यांना गुरुस्थानी मानायचे. त्यानंतर 10 वी व १२ वी चे शिक्षण त्यांनी घेतले. त्यावेळी विभागातील मारामारी पोलिसांची मनमानी याने त्याचे मन खिन्न होत असे. अस किती दिवस चालणार असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात झोकून दिल्यामुळे तेथे काँग्रेसचे माजी नगरसेवक त्यानंतर शिवसेना नेते असलेले विजय लोके, किशोर शिंदे यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी काँग्रेसची विचारधारा स्विकारली
१९८९-९० साली काँग्रेसचे नेते दादासाहेब रूपवते यांच्याशी त्याला सहवास लाभला. आणि त्याचा आंबेडकरी चळवळीशी
संबंध आला. तिथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी बांधिलकी ठेवून ते काम करीत आहेत. काँग्रेसने त्यांना पक्ष बळकटीसाठी शिवडी तालुका काँग्रेस झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष, दक्षिण मध्य मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस पद भूषविले आहे. कॉंग्रेस मध्ये काम करीत असताना त्याने चित्रपट नाट्य त क्षेत्रात २००७ साठी प्रवेश केला. आणि त्याचे सभासदत्व मिळविले. त्यानंतर त्यानी अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये सहभाग नोंदविला. लावणीचे आयोजन केले. पहिले नाटक गोष्ट प्रेमाची व्यावसायिक नाटक म्हणून प्रवेश केला. त्यानंतर त्यानी चित्रपट क्षेत्रात, दिग्दर्शन, सहाय्यक निर्माता म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे आपला मोर्चा वळविला, हे करीत असताना ते स्वत: स्पॉट बॉय म्हणून त्यांनी काम केलेले विसरले नाहीत. ३१ डिसेंबर २०१८ साली त्यानी ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेकनिशियन अँड आर्टिस्ट युनियनची स्थापना केली.
महाराष्ट्र मराठी सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष असून या संघटनेचे माध्यमातून संपूर्ण भारतभर कामकाज सुरू केले. चांगली मंडळी त्यांच्यासोबत आली आणि संघटनेचे काम फोफावले. अतिशय कष्टमय जीवन जगत दीपक काळिंगन यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व धारदार आणि कर्तबगार बनवले आहे. त्यांच्याकडून निश्चितच युवा पिढीला आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांनी दैनिक प्रहार शी मोकळेपणाने संवाद साधला.











