सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग रणरागिणींचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग रणरागिणींच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित ‘ऑनलाईन किल्ले बनवा ‘ स्पर्धा जाहिर करण्यात आली आहे. खास दिवाळी निमित्त आयोजित किल्ले बनवा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या वैभवशाली इतिहासाला उजाळा देऊया, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
ही स्पर्धा २ गटांमध्ये होणार असून
गट एक – वयोगट ६ ते १४ तर गट दोन – वयोगट १४ ते २२ असा ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख २२ ऑक्टोबर ही असणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी अश्विनी सावंत -७७७७०७५०५२, प्राची मगर – ७३७८३७२०५६ या नंबरवर करावी. तर आपल्या किल्ल्यांची
व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख २६ ऑक्टोबर असल्याचेही स्पष्ट केले असून दरम्यान आपले व्हिडिओ
एकनाथ गुरव – ९०११४८६८८१,
उदय राऊळ – ९४२१०५९७८३ या क्रमांकावर पाठवावेत असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, स्पर्धेला निकाल ३० ऑक्टोबर रोजी होणार असून पारितोषिकेही जाहीर करण्यात आली आहेत.
१)दोन्ही गटातील पहिल्या 3 विजेते स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांवरील पुस्तक
२) दोन्ही गटातील पहिल्या 3 विजेते स्पर्धकांना प्रमाणपत्र
३) तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी नियमावलीही जाहिर करण्यात आली असून यात
१. किल्ला हा माती पासून बनवलेला असावा काल्पनिक रित्या बनवलेला नसावा.
२. व्हिडिओ साडेतीन मिनिटांची असेल ( वीडियो मध्ये सुरुवातील स्वतःच नाव/गट/ किल्ल्याचे नाव सांगून किल्ल्याबद्दल माहिती द्यावी.)
३. स्पर्धेत सहभाग निःशुल्क आहे
४. स्पर्धेत बदल करायचे हक्क संस्थेने राखून ठेवले आहेत.
५.स्पर्धेचा निकाल परीक्षकांनी दिलेले गुण व वीडियोला मिळालेल्या लाईक नुसार जाहीर करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Sindhudurg