कोकण रेल्वे कोकणभुमी प्रकल्प कृती समिती येत्या १५ दिवसात उपोषण करणार

प्रश्न न सुटल्यास रेल रोको करणार

रत्नागिरी :कोकण भुमी प्रकल्पग्रस्त कृती समिती प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी यासाठी सतत करायशील असून रेल्वे अधिकाऱ्यांना यासाठी निवेदन देण्यात आली. कोकण रेल्वे पुर्ण कॉन्ट्रॅक्ट प्रध्दतीने चालविले जात असून त्यांना मॅनपॉवरची गरज असूनसुध्दा भरती करत नाहीत असे कोकण भुमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे म्हणणे आहे.

 

गेल्या महिन्यामध्ये रेल कामगार सेना युनियन यांच्यामार्फत रेल्वे अधिकारी श्री. मेश्राम यांना प्रकल्पग्रस्त यांची लिस्ट देण्यात आली होती. त्याची आज पर्यंत व ह्याआधी व आता सुध्दा दखल घेतली गेली नसुन रत्नागिरी क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक कांबळे व सीपीओ अनुराग मेश्राम यांच्यासमवेत गेल्या वर्षात २९ डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरीमध्ये मिटींग घेण्यात आली होती त्या मिटींग मध्ये स्वतः सीपीओ अनुराग मेश्राम यांनी प्रकल्पग्रस्तांची दखल घेवून MIDC ऑफीसध्ये तोंडी प्रकल्पग्रस्तांना आश्वासन दिले होते. भरती प्रक्रिया ओपन न करता त्या परिस्थितीत कोकण रेल्वे चालवली जात आहे. प्रकल्पग्रस्तांना कुशल असे ट्रेनिंग देवून सेवेत रुजु करुन घ्या हे वेळोवेळी सांगत आहेत. तरी काहीही दखल न घेता वेळ मारुन चाल ढकल हे अधिकारी करत आहेत.

 

कोकण रेल्वेही विलीनिकरण करुन कोकण रेल्वे हा स्वतंत्र कोटा रहाण्यासाठी आपण कोकण रेल्वे कार्पोरेशन ही व आता चालू असलेल्या युनियनने व अधिकारी यांनी कोकण रेल्वे वाचविली पाहिजे. कारण जर रेल्वे सेंट्रलमध्ये गेली तर प्रकल्पग्रस्त पुर्णपणे उघड्यावर पडतील. प्रकल्पग्रस्तांचा जराही विचार केला जाणार नाही. लोटे, चिपळूण येथे रेल्वे कारखाना होत असून तेथे तरी प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजु करुन घ्यावे. कृती समितीच्या वतीने जनता दरबार लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी समितीच्या वतीने विनंती करण्यात आली होती.

 

कोकण रेल्वे व भरती प्रक्रिया अधिकारी यांनी याकडे प्रकल्पग्रस्तांमध्ये दुर्लक्ष केले आहे. कोकण रेल्वे प्रकल्प ग्रस्तांची वयोमर्यादा वाढली असूनही ह्या अधिकारी यांच्या वेळकाढुपणामुळे वाढली आहेत. मात्र आत्ता येत्या १५ दिवसात रत्नागिरी किंवा खेड येथे रेल्वे स्टेशन येथे उपोषण करणार अन्यथा रेल रोको आंदोलन करणार असा इशारा कोकणभुमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने संतोष चव्हाण यांनी दिला आहे. अधिक माहितीसाठी चव्हाण ९४२१५९९९१८ व कार्याध्यक्ष मुकादम -९९२१४३५३७८ व अमोल सावंत ७९७२५४२३२१, कृतीसमिती उपाध्यक्ष चिपळूण श्री. संदिप आंब्रे ८७८८६१४९४१ यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.