शेठ म. ग. हायस्कूल देवगडची ‘बुरगुंडा’ प्रथम

 

मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे बालनाट्य स्पर्धा ; मँग्रोव्ह फाऊंडेशन, इको फोक्स व्हेंचर्स आणि स्वराध्या फाऊंडेशनचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : मँग्रोव्ह फाऊंडेशन, इको फोक्स व्हेंचर्स आणि स्वराध्या फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजीत बालनाट्य स्पर्धेत शेठ म. ग. हायस्कूल देवगडच्या ‘बुरगुंडा’ या नाटीकेने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय- बारस (मित्र, शिरगाव), तृतीय- मूलमंत्र ( रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण) यांनी पटकावला. उत्तेजनार्थ- नवी पालवी फुटेल (युरेका सायन्स सेंटर, कणकवली) यांना मिळालाआहे.

विजेत्यांना परीक्षक व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचा सविस्तर निकाल – पुरूष अभिनय – प्रथम- धैर्य सावंत (बुरगुंडा, शेठ म. ग. हायस्कूल, देवगड), द्वितीय- कृष्णा मांजरेकर (कांदळवन नंदनवन, डॉ. दत्ता सामंत इंग्शिल स्कूल, देवबाग ), तृतीय- केतक मेस्त्री- ( मूलमंत्र, रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण ) स्त्री अभिनय प्रथम – माही साटम ( बारस, मित्र शिरगाव), द्वितीय नेहा पाटील (बुरगुंडा, शेठ म. ग. हायस्कूल देवगड), तृतीय – सावरी कांबळे (बुरगुंडा, शेठ म. ग. हायस्कूल, देवगड), तांत्रिक अंगे- प्रथम- शेठ म. ग. हायस्कूल देवगडचे तंत्रज्ञ ( बुरगुंडा), द्वितीय- मित्र शिरगावचे तंत्रज्ञ (बारस, मित्र शिरगाव), तृतीय- समीर चांदरकर (व्यथा कांदळवनाची गरज संवर्धनाची वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टा ), उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन – आज्ञा अभिषेक कोयंडे (बुरगुंडा, शेठ म. ग. हायस्कूल, देवगड) स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभय खडपकर, वैशाली पंडित, नितीन वाळके यांनी काम पाहिले.

पारितोषिक वितरण कार्यक्रमास स्वराध्या फाउंडेशनचे गौरव ओरसकर, सुशांत पवार, सुधीर कुर्ले, गौरीश काजरेकर, अभय कदम, विलास देऊलकर, महेश काळसेकर, सुनील परूळेकर, शांती पटेल तसेच स्वराध्याचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी छोट्या बयोची मोठी स्वप्ने या सोनी टिव्हीवरील मालिकेतील बालकलाकार चिन्मया ठाकूर, शौरीन देसाई, निकुंज शिवलकर यांचा स्वराध्याच्यावतीने सत्कार करण्यात आला.

बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते झाले. बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना बालपणापासून अभिनयाचे धडे मिळतात. मँग्रोव्ह फाऊंडेशन, इको फोक्स व्हेंचर्स आणि स्वराध्या फाऊंडेशनने बालनाट्य स्पर्धेचा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. पालकांनी मुलांना बालनाट्यमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. बालनाट्य स्पर्धांच्या माध्यमातून लहान मुलांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते. असे ते म्हणाले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी इकोफॉक्स व्हेंचर्सचे परेश पिंपळे, कांदळवन प्रतिष्ठानच्या दुर्गा टेकळे, सौम्या कुर्ले, मिनू देऊलकर यांचे सहकार्य लाभले.