खेड(प्रतिनिधी) डोळ्यांचे पारणे फेडणारा बांद्यातील स्टॅच्यु कलेने महाराष्ट्र सांस्कृतिक चळवळीत मानाचे स्थान पटकाविल्यानंतर आता खेड जेसी फेस्टिवल मध्येही ही कला झळकणार आहे .६ ते ११ फेब्रुवारी या कालावधी होणाऱ्या जेसी फेस्टिवल मध्ये बांद्याच्या स्टॅच्यु संघाला निमंत्रित करण्यात आले आहे .
या वर्षी जेसी आय खेड ने सेल्फी स्टॅच्यु ही नवीन संकल्पना या ग्रूप ने राबवली आहे. या स्टॅच्युमध्ये सहभागी होणारे कलाकार सलग आठ तास पुतल्याप्रमाणे उभे राहून आपली कला सादर करणार आहेत.हे कलाकार कोणतीही प्रतिकृती हुबेहूब साकारणार असल्याने खेड वासिय देखील ही कला पाहून थक्क होणार आहेत.
या शिवाय रंग फेस्टिवलचे या आगळा वेगळा उपक्रम देखील होणार आहे ६ ते ११ फेब्रुवारी
या सहा दिवशी फेस्टिवलला भेट देणाऱ्या खेड वासियांसाठी प्रत्येक दिवशी रंग निश्चित करण्यात आला आहे . ज्या दिवशी जो रंग असेल व त्या रंगाचे कपडे ज्यांनी परिधान केले असतील असे कपडे परिधान करणाऱ्या व्यक्तीं मधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड करून वेगवेगळ्या भेटवस्तू देण्यात येणार आहेत .











