मत्सगंधा एक्सप्रेस मध्ये धाडसी चोरी, २२ लाखांचे दागिने चोरट्याने लांबवले

crime sonyachi chori

को रे मार्गावरील खेड नजीकच्या विन्हेरे स्थानका नजीकची घटना

खेड (प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मत्सगंधा एक्सप्रेस मधील बोगी नं- बी ४ मध्ये धाडसी चोरी घडल्याचा प्रकार पुढे आला असून तब्बल २२ लाख ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी कोकण रेल्वे मार्गावरील खेड नजीकच्या विन्हेरे स्थानका नजीक घडली या प्रकरणी शनिवारी येथील पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रमा सुरेद्र माडा रा. वाशी नवी मुंबई यांनी तक्रार दाखल केली आहे.फिर्यादी या उडीपी ते एलटीटी असा गाडी नं-१२६२० अप मत्सगंधा एक्सप्रेस या गाडीचे बोगी नं- बी / ४ मध्ये ३६ वरून रात्री २२.३० या मंडगाव रेल्वे स्टेशन येथून प्रवास करित असताना खेड नजीकच्या विन्हेरे रेल्वे स्टेशन येण्यापुर्वी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या झोपेचा फायदा घेवुन त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स आतील रोख रूपये व दागिन्यांसह चोरून नेली

एकुण २२ लाख ७० हजार ५०० रु. च्या ऐवजा मध्ये एक खाकी रंगाची लेडीज पर्स ४५,हजार रोख त्यामध्ये रु.५०० दराच्या ८८ नोटा, तसेच रू.१०० दराच्या १० नोटा , ४ लाख ,५०, हजार रू दोन हिरेजडीत सोन्याच्या बांगड्या वजन माहीत नाही.
४,लाख रू. कि. एक सोन्याची चैन त्याला हिरेजडीत पॅन्डेट वजन माहीत नाही. ४,००,००० रू. कि. एक सोन्याच्या बांगड्या०८ नग वजन ८० ग्रॅम कि. अंदाजे ४,लाख ५० हजार ,- रु. कि. एक सोन्याची चैन त्यामध्ये एलीजाबेट डॉलर पॅन्डंट असलेले ४,लाख ५० हजार रू चे दोन सोन्याचे नेकलेस ७५ हजार ,५०० रू कि. एक सोन्याचे पॅन्डंट आधारकार्ड, पॅनकार्ड, चेक बुक दोन एटीएम कार्ड, पासबुक आदी चोरून नेले.