खोपीत मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा

crime marhan
खेड | प्रतिनिधी : तालुक्यातील खोपी – तांबडवाडी येथे एकास लाकडी दांडक्याने मारहाण करत दुखापत केल्याप्रकरणी मयुरेश मानसिंग घोरपडे (२९, रा. मिर्ले- हुंबरवाडी) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग रामचंद्र माने (६०, मिर्ले-हुंबरवाडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत संतोष मानसिंग भोसले (५०, खोपी – तांबडवाडी) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यातील जखमी पांडुरंग माने यांनी हातात लाकडी दांडा घेऊन घरात शिरत डोक्याच्या उजव्या बाजूस दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.