खेड(प्रतिनिधी) येथील खेड जेसिजचा वैविध्यपर्ण जेसी फेस्टिव्हल शहरातील गोळीबार मैदान येथे मंगळवारी कानिर्व्हल ने प्रारंभ करण्यात आला जेसी फेस्टिवल ला उद्योजक विलास बुटाला यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व .आमदार योगेश कदम यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वार याची फित कापून करण्यात आले.
श्री सिद्धिविनायक मंदिर सोनार आळी येथे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर , शिशिकांत मेहता , विनायक वैद्य , अनिल सदरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जेसी फेस्टिवल कार्निवलचे उद्घाटन करण्यात आले . या मध्ये चिपळूण येथील स्वरब्रम्ह वाद्य पथक, रिदम ओरकरेस्टरा, श्री समर्थ विश्व स्कूल , ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, एल टी टी स्कूल , स्केटिंग ग्रुप, सैनिक स्कूल जामगे , डॉक्टर असोसिएशन , ज्येष्ठ नागरिक संघ , कोकण मुस्मिल संघ , तसेच शहरातील विवध सामाजिक संस्था यांनी ,विविध राजकीय पक्ष यांनी सहभाग घेतला. श्री सिद्धिविनायक मंदिर ते गोळीबार मैदान जेसी फेस्टिवल शोभायात्रा काढण्यात आली ही यात्रा लक्षणीय ठरली
हा फेस्टिव्हल ११ फेब्रुवारी दरम्यान हा फेस्टिव्हल सुरू राहणार असून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत फेस्टिवल मध्ये कन्झयुमर फूड, आनंदमेळा यांचे आकर्षण असणार आहे. या वेळी – विभागीय अध्यक्ष अतुल गोंदकर पोलीस निरीक्षक नितिन भोयर आगार व्यवस्थापक खेड श्री. रवींद्र वनकुद्रे यांच्यासह जेसिजचे कार्यक्रमप्रमुख अमोल क्षीरसागर ,अद्यक्ष संकेतअपिष्टे, सचिव अमर दळवी यांच्या सह पदाअधिकारी व सदस्य उपस्थित होते.











