नमो चषक टेबल टेनिस स्पर्धेत इशांत वेंगुर्लेकरला तिहेरी मुकुट

१५ वर्षांखालील मुली गट सई कांबळी विजेती : १७ वर्षांखालील मुली गट आर्या दिघे विजेती

मालवण कुडाळ मतदारसंघात भाजप नेते निलेश राणे यांच्या संकल्पनेतून भाजप युवा मोर्चाचे आयोजन 

अमित खोत | मालवण : जय गणेश स्कूल मालवण येथे संपन्न झालेल्या कुडाळ मालवण मतदारसंघ टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षांखालील मुले, पुरुष दुहेरी व खुल्या गटात विजेतेपद मिळवत इशांत वेंगुर्लेकर याने तिहेरी मुकुट मिळविला.

 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सिंधुदुर्ग आयोजीत नमो चषक ॲथलेटिक्स टेबल टेनिस स्पर्धेचा उद्धघाटन सोहळा भाजपा नेते, कुडाळ- मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या हस्ते जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवण येथे बुधवारी संपन्न झाले. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाचे सर्वांनीच कौतुक केले. मालवण टेबल टेनिस असोसिएशन यांनी स्पर्धा आयोजन बाबत निलेश राणे यांचे आभार मानले. अश्या स्पर्धा आयोजनातून खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळाले. अश्या स्पर्धा आयोजन व्हाव्यात. आपलाही सपोर्ट राहील असे असोसिएशन च्या वतीने सांगण्यात आले.

 

टेबल टेनिस स्पर्धेचा निकाल :

१५ वर्षांखालील मुली – सई कांबळी विजेती, प्रतिभा परुळेकर उपविजेती. १७ वर्षांखालील मुली – आर्या दिघे विजेती, वर्षा परुळेकर उपविजेती, १७ वर्षांखालील मुले – इशांत वेंगुर्लेकर विजेता, प्रत्युष शेट्टीगार उपविजेता, पुरुष खुला गट – इशांत वेंगुर्लेकर विजेता, चंद्रकांत साळवे उपविजेता, पुरुष दुहेरी- इशांत वेंगुर्लेकर आणि चंद्रकांत साळवे विजेते, गौतम वाडकर आणि अतुल गवस उपविजेते ठरले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 18 फेब्रुवारी रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. अशी माहिती स्पर्धा संयोजक महेंद्र पारकर यांनी दिली आहे.

 

स्पर्धा आयोजनाचे कौतुक

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या संकल्पनेतून युवा वर्गाला स्पर्धा व्यासपीठ मिळण्यासाठी नमो चषक आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारातून एक दर्जात्मक व स्पर्धात्मक व्यासपीठ खेळाडूंना उपलब्ध झाल्याचे सर्वांनी सांगत स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले.