मंडणगड l प्रतिनिधी :राज्य शासनाकडून श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय व प्राधान्य कार्ड धारक लाभार्थी यांना प्रति कुटुंब एक शिधा संच ( ज्यामध्ये प्रति संच १ किलो पामतेल,साखर व अर्धा किलो चणाडाळ,रवा,पोहे,मैदा ) मात्र 100/- रुपयामधे वाटप करण्याचा निर्णय झाला आहे . तसेच दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ते 24 मार्च होळी या कालावधी दरम्यान केवळ अंत्योदय कार्डधारक यांना मोफत वाटप साडी वाटप करण्याचा शासन निर्णय देखील झाला आहे. त्यानुसार मंडणगड तालुक्यामध्ये धान्य गोदामात एकूण 10000 आनंदाचा शिधा संच व 1576 अंत्योदय कार्ड धारकांसाठी साड्या प्राप्त झाल्या आहेत.
त्यामुळे मंडणगड तालुक्यात आज रास्त दुकानदार मंडणगड व पाट या ठिकाणी प्रत्यक्ष मा.जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रोहिणी रजपुत, जिल्हा कार्यालयातील पुरवठा निरीक्षक श्री.मनोज पवार व मंडणगड तालुक्याचे पुरवठा निरीक्षक श्री.मयुर पौळ यांच्या हस्ते शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा संच व साड्या देउन आनंदाचा शिधा संच व साड्यांच्या वाटपाची सुरुवात करण्यात आली.सदर आनंदाचा शिधा संच व साड्या लवकरात लवकर तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थी यांना वितरीत करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी मा.जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले.











