क-हेकाठी रंगले कवी संमेलन

सासवड:
मालवणी कवितांना मिळाली विशेष दाद
पुणे
सासवड दि. ११ फेब्रुवारी रोजी २६ वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. यावेळी विविध परिसंवाद, बालमेळावा व कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते संमेलनात अनिल आठलेकर यानी बाबी ही मालवणी बोलीतील कथा सादर केली. डाॕ अविनाश आवलगावकर,कृष्णात खोत ,माजी आमदार ढोबळे यांच्या साहित्यविषयक विचारांनी संमेलन गाजले.

मोजक्या पण समाज वास्तव निर्भिडपणे व्यक्त होणाऱ्या कविता लिहिणा-या बाळकृष्ण लळीत यांनी ‘बाबासाहेबांची सावली, झेंडा.व्हॕक्सिन राजा’ ‘नटरंग.’ या कविता सादर केल्या .
ढीगभर बाया…!
या बाया… रातदीन कष्ट करणाऱ्या … आणि संसारासाठी त्याग करणाऱ्या …
महानगरात वाळु सिंमेट वीटा यांची यांच्या इमारतीच्या बांधकामावर काम करणाऱ्या आहेत … कामावर जाताना आनंदाने ..उत्साहाने गाणी म्हणणा-या या अगणित बाया.. कामावरून पुन्हा आपल्या घरट्यात येताना… मात्र ‘त्यांच्या चोची मुक्या झालेल्या !
असे कवी का म्हणतो..?
या दरम्याने प्रखर व भीषण वास्तव काय असते?
आणि वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या या कष्टकरी माय भगिनिंचे पुढे काय होते.. ?बाळकृष्ण लळीत यांची मन सुन्न करणारा अनुभव रेखाटन करणारी कविता..
ढीगभर बाया….!

काळ्या नि कुळकुळित .. जात-येत होत्या समजणा-या त्यांच्या रस्ताभर कुणालाही न भाषेत स्वतःचे जगणं मरणं गात सरकत होत्या बाया त्यांच्या डोकीवर घमेलित काल
कमावलेले ‘पोट’नि उद्याच्या ‘पोटासाठी’…आजचं घमलं…!
बाया सरकत होत्या नि अख्खा दिवस त्यांना खात होता ….. ! वाळू सिंमेट नि विटांची घमेली उचलून येताना त्यांच्या चोची नि शरीरं मुकी झालेली रात्री चूल*पेटवून भाकरी भाजून स्वतःलाही
करपवून घ्यायच्या बाया. त्यांच्या जगण्याची उमेदच इतक दांडगी … की सकाळी पुन्हा गाणी गायच्या बाया. नि स्वतः ला राबवत.. सडवत .. संपवत..ओरबाडून घेत होत्या बाया.
यानंतर त्यांनी सादर केलेल्या ‘कोरोना’ पार्श्वभूमीवरील ‘व्हॕक्सिन राजा ‘या मालवणी कवितेला रसिकांकडून खूपच दाद मिळाली.

‘कोणीतरी टोचारे त्या म्हातारेक
इनिक्शान
थकान-भागान इलिहा
सात कवळकाडी नि सात व्हाळ
तुडदव्.
जगूचा आसा तिका
‘हापूस’सारा.
नि पिकाचा आसा कापसा सारा…
मागा नकोत रे तिका आधार नि मोबाईलचो नंबर’
हाडल्याहान तिना शेषनसायबाचा इलेक्शनचा कार्ड.’
पुन
‘गेटी’ वरसुनच तिका दिल्यानी परतवन…
‘ व्हॕक्सीन राजा…’
तूच आसस रे बाबा तिचो
दशांत्री राजा.
यानंतर …
“काही वर्षांनी कुणी म्हणेल
पूर्वी इथे शेती करणारे लोक राहायचे
निराशेची वावर नांगरून
भयंकर काबाडकष्टाने आणि धान्य पिकवायचे
आम्ही सतत त्यांना मातीत घातलं म्हणून
नाहीतर आज तर त्यांचं राज्य असतं ”
ही शेतकऱ्यांची अवस्था अधोरेखित करणारी कविता कल्पना दुधाळ यांनी सादर केली. निमित्त होते आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड ,महाराष्ट्र साहित्य परिषद ,सासवड शाखा आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या २६ वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनात क-हेकाठी सायंकाळी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, अण्णासाहेब खाडे, शांताराम पोमण , बंडूकाका जगताप, प्रा.डॉ. अरुण कोळेकर, वसंतराव ताकवले ,जगदीश शेवते, बाळासाहेब मुळीक, शिवाजी घोगरे ,कुंडलिक मेमाणे आदी मान्यवर उपस्थित होते .
कवी संमेलनासाठी कल्पना दुधाळ, बाळासाहेब लबडे, बाळकृष्ण लळित, प्रवीण जाधव, नितीन मोटे,शुभांगी जाधव, राजेंद्र सोनवणे, विरजा जाधव, शरद पाडसे यांनी आपल्या सामाजिक, प्रेम विषयक, राजकीय ,स्त्री जाणिवेच्या आणि निसर्ग विषयक काव्यरचना सादर करून कवी संमेलनात रंग भरले.
राजेंद्र सोनवणे यांनी सादर केलेल्या
हे माणूस मारणारी धर्म कोणते रे
प्रेमावरी इथे ही पृथ्वी जिवंत आहे
या काव्यओळींना रसिकांनी भरभरून दाद दिली.
पाचट कवितेतून नितीन मोटे यांनी ऊसतोड कामगारांचे अस्वस्थ करणारी जीवन विषयक वास्तव उभे केले.
तर बाळासाहेब लबडे यांनी
गब्बर शिवाय सरकारला कुणाचा धाक नाही
त्येचो शिवाय डिझेलचा भाव कमी होत नाय
ही राजकीय खारवी बोलीतील कविता सादर केली. बाळकृष्ण लळित यांनी स्त्रियांचे दुःख मांडणारी कविता सादर केली .प्रवीण जाधव यांनी बापाचे चित्रण करणारी कविता गायली.
शुभांगी जाधव यांनी
इतरांच्या सुखासाठी स्वहित हरवलं
गाव ओलांडताना अंतर कसं वाढलं
अखेरचे हे गाव माझं आलं
ही गावाविषयीची संवेदना व्यक्त करणारी कविता सादर केली .
विरजा जाधव यांनी
गर्द हिरव्या वस्त्रात गुदमरलेला देह…
साधका सांग ना ….सुटेल का रे मोह ?
असा प्रश्न विचारणारी कविता सादर केली.
कवी संमेलनाचे रंगत वाढविणारे सूत्रसंचालन व‌ संयोजन कवी दशरथ यादव यांनी केले. विजय कोलते यांनी कवींचे स्वागत केले. बाळासाहेब मुळीक यांनी कवींचे व रसिकांचे आभार मानले. संमेलन यशस्वी करण्यासाठी विजय कोलते ,अण्णासाहेब खाडे डॉ . अरुण कोळेकर व सर्व पदाधिकारीं मंडळींनी परिश्रम घेतले.