
प्रशासनाकडून पर्यायी बस पाठवण्यात दिरंगाई
रत्नागिरी : रत्नागिरी धोपावे गाडी शनिवार दिनांक 17/02/2024 सकाळी 6:45 वाजता रत्नागिरी येथून सुटते. ही गाडी ah गाडी जाकादेवी येथे आठ वाजता तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. एसटी प्रशासनाने बारा वाजत आले तरीही त्या प्रवाशांसाठी कोणत्याच प्रकारची पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
संबंधित प्रवाशांनी आगारातील स्थानक प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता गाडी पाठवली आहे मेकॅनिक पाठवले आहेत अशी उत्तरे मिळाली. पण सकाळी आठ वाजल्यापासून 11.30 पर्यंत प्रवासी ताटकळत अडकून पडले आहेत अजून किती वेळ जाईल कुणालाच माहिती नाही. यामुळे या एसटीच्या प्रशासनाच्या कारभारावर प्रवासी संतप्त झाले आहेत. बंद पडलेल्या बस मधील प्रवाशांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरलं होतं आहेत.










