वैभववाडी l प्रतिनिधी : सांगुळवाडी येथे शिवजयंती उत्सव निमित्त सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी शिव महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.
सोमवार दि. १९ रोजी सायंकाळी ४ वा. शिव अभिवादन रॅली, ४ ते ६ वा. ढोल पथकांचे संचलन, ६ ते ८ गुणवंतांचा सत्कार, शिवसन्मान व शिवसत्कार, रात्री ८ वाजता शिव अभिवादन सभा, रात्री ८.३० वा. शिवचरित्र पोवाडा शाहीर संजय जाधव इचलकरंजी. तरी या महोत्सवामध्ये परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सांगूळवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.











