लांजा( प्रतिनिधी) लांजा तालुका भाजपा च्यावतीने शहरातील पक्ष कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सोमवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात भाजपाच्या विधानसभा निवडणुक प्रमुख उल्का विश्वासराव यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुक्याचे अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना खामकर, तालुका सरचिटणीस विराज हरमले आदींसह बावा राणे व अन्य कार्तयकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
………………………………………………..











