२ री श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबरअली यास दुहेरी मुकुट

 

श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव, श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी आयोजित व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २ री श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२३-२४ रोजी राधाकृष्ण मंदीर, राधाकृष्ण नाका, रत्नागिरी येथे दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचा पुरुष एकेरीचा सामना अतंत्य रोमहर्षक झाला. गत वर्षीच्या पहिल्या श्रीमंत पेशवाई चषकाचा मानकरी असलेल्या रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाण याने आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबरअली याच्या बरोबर पहिला सेट २५-१२ असा सहज जिंकला व दुसऱ्या सेट मध्ये पाच बोर्ड अखेर २४-४ अशी निर्णायक आघाडी घेतली होती परंतू आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबरअली याने आपल्या अनुभव प्राणाला लावत पुढील तीन बोर्डात २१ गुण मिळवत दुसरा सेट मध्ये विजय मिळवून सामन्यात रंगत निर्माण केली व तिसऱ्या सेट मध्ये एक ब्लाँक टू फिनिश करत सदर सेट २५-११ असा जिंकून दुसऱ्या श्रीमंत पेशवाई चषकावर आपले नाव नोदवले. सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव व श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी यांचे श्री राजू खेडेकर , श्री मिलिंद दळी, श्री परिमल खेडेकर, श्री ओंकार शेरे, योगेश मलुस्टे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी, श्री नितीन लिमये ( खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री सचिन बंदरकर (स्पर्धा प्रमुख) श्री विनय गांगण ( सदस्य, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री विवेक देसाई ( सदस्य, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ),प्रमुख पंच श्री मंदार दळवी, सागर कुलकर्णी व बहुसंखेने खेळाडू प्रेशक उपस्थित होते.

 

सदर स्पर्धेच्या बक्षीस प्रसंगी श्री प्रमोद शेरे( सल्लागार, श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी), श्री मिलिंद दळी, श्री परिमल खेडेकर, श्री मिलिंद शेरे, श्री ओंकार शेरे, योगेश मलुस्टे, कोंतय खेडेकर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी, श्री नितीन लिमये ( खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री सचिन बंदरकर (स्पर्धा प्रमुख) श्री विनय गांगण ( सदस्य, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री विवेक देसाई ( सदस्य, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ),प्रमुख पंच श्री मंदार दळवी, सागर कुलकर्णी व बहुसंखेने खेळाडू प्रेशक उपस्थित होते.

 

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

 

पुरुष एकेरी अंतिम फेरी – रियाज अकबरअली विजेता विरूद्ध अभिषेक चव्हाण १२-२५, २५-२४, २५-११

 

उपांत फेरी १ रियाज अकबरअली विजेता विरूद्ध योगेश कोंडविलकर २५-०७,२५-११

 

उपांत फेरी २ अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध राहुल भस्मे २५-१५, १८-२५, २५-११

 

पुरुष दुहेरी अंतिम फेरी – रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध योगेश कोंडविलकर / संजय कोंडविलकर २५-१५, २५-०९

 

उपांत फेरी १ रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध नितीन लिमये / दिनेश पारकर २५-१६,२५-१८

 

उपांत फेरी २ योगेश कोंडविलकर / संजय कोंडविलकर विजेता विरूद्ध अभिजित खेडेकर / दीपक वाटेकर २५-१८ ,२५-१०

 

कुमार गट अंतिम फेरी – ओम पारकर विजेता विरूद्ध सर्वेश महाकाळ २५-००, ००-२५, २५-००

 

किशोर गट अंतिम फेरी – आर्यन राऊत विजेता विरूद्ध सोहम बुटाला २०-०६, २५-०१

 

कुमारी गट अंतिम फेरी – स्वरा मोहीरे विजेती विरूद्ध समीरा शिंदे २१-१४, २५-०५

 

कळावे

 

 

 

श्री. मिलिंद साप्ते.

 

सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन