महामार्गा वरील धामणी नजीक ट्रक टँकर धडक मृत टँकर चालकावर गुन्हा

 

खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गा वरील विरंगळा हॉटेल पीरलोटे धामणदेवी नजीक ट्रक व टँकर यांच्या मध्ये समोरा समोर झालेल्या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी मृत चालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अपघात १७ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडला होता

मल्लाप्पा भिमशा बगळे वय ४४ वर्षे रा. हातुरे वस्सी एअरपोर्ट जवळ हारगी रोड दक्षिण सोलापुर असे गुन्हा दाखल झालेल्या मृत टँकर चालकाचे नाव आहे
तर याबाबत ची फिर्याद संजय आनंदा पाटील वय ३७ वर्षे रा येळाणे पो मलकापुर ता शाहुवाडी जि कोल्हापुर यांनीं दिली असून हा ट्रक चालक जखमी झाला आहे

फिर्यादी याच्या ताब्यातील ट्रक क्र एम.एच.०९.ई.एल. ७२९५ हा मलकापुर ते माणगांव असा मुंबई गोवा हायवे रोडने चालवित जात असताना टैंकर क्र.एम.एच.१३ डी. क्यु. ४५६२ वरील मयत चालक बगळे याने खेड चिपळुन जाणारे मार्गावरील हायवे रोडच्या मध्यभागी असणा-या डिव्हायडर ओलाडुन भरधाव वेगाने फिर्यादीच्या ताब्यातील ट्रकला समोरुन जोरात धडक देवून अपघात केला सदर अपघातामध्ये दोन्ही गाडीचे समोरील बाजुसचे मोठ्याप्रमाणात नुकसानीस तसेच फिर्यादीचे किरकोळ दुखापत व उजव्या मांडीला व छातीला मुक्का मार लागला व स्वताचे मरणास कारणीभूत झाला.म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे