खेड: नोकरी मिळत नाही म्हणून तरुणाने आत्महत्या करून स्वतःला संपवले

 

खेड(प्रतिनिधी) नोकरी मिळत नाही म्हणून आलेल्या नैराश्य मधून एका ४१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली ही घटना शहरातील एस. टी. डेपो जवळील स्वरूपनगर येथे घडली

अभिषेक सुरेश ताठरे वय- ४१ असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे अभिषेक याला नोकरी मिळत नसल्याने नैराश्य येऊन त्याने मध्ये येवुन घराच्या जिन्याच्या कोप-यावर शेडच्या लोखंडी बारला कॉटनच्या बेडशिटने गळफास लावुन घेवुन आत्महत्या केली या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत