शिवजन्मोत्सवातून छत्रपतींचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून, खऱ्या अर्थाने सुराज्याची स्थापना करावी – आम.नितेश राणे

माजी अध्यक्ष सचिन नाकाडी यांना आदरांजली वाहून, शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : शिवगडावरून दीपक इस्वलकर, संभाजी पाचंगे, अजिंक्य पोकळे, दुर्वांकुर मेस्त्री,दत्तराज नराम यांनी ज्योतदवडीने एस टी स्टँड आवारात प्रवेश करताच, शिवरायांच्या जयजयकारांच्या बुलंद घोषणांनी परिसर दुमदुमला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आग्रे आणि फोंडाघाट सरपंच सौ संजना आग्रे यांचे हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी शिव-साम्राज्य प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांनी जय भवानी जय शिवाजी च्या घोषात शिवरायांना अभिवादन केले.संपूर्ण दिवसभर छत्रपतींचे पोवाडे आणि शिवपराक्रमाच्या शौर्य गीतांनी स्टॅन्ड परिसर उत्साही बनला होता.


संध्याकाळी ओमकार कला मंच, सावंतवाडीच्या बहुरंगी- बहुढंगी – रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात मनोज रावराणे यांनी श्रीफळ वाढवून केली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सचिन नाकाडी यांना आदरांजली वाहताना,शिव-साम्राज्याचे कार्य अखंडित राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणि शिवजन्मोत्सवातून छत्रपतींचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून खऱ्या अर्थाने सुराज्याची स्थापना करावी.असे आवाहन केले.यावेळी त्यांचे सोबत सौ. सुजाता हळदिवे, सिद्धेश पावसकर, सुनील लाड, पवन भालेकर,भालचंद्र राणे, एकनाथ कातरुड इत्यादी उपस्थित होते.

यादरम्यान खास. विनायक राऊत, सौ. माधवी दळवी आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन प्रतिष्ठानच्या सातत्य पूर्ण उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. ह्या रंगारंग कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अबाल- वृद्ध महिला – पुरुष आणि युवाई उपस्थित होती. सलग सातव्या वर्षी अध्यक्ष जयेश पटेल, दीपक इस्वलकर, प्रथमेश कल्याणकर, साहिल डोरले,विशाल रेवडेकर, गणेश इस्वलकर, फोंडेकर, राजू परुळेकर, सागर सामंत, संतोष नाकाडी, सागर साटम इत्यादी मावळ्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे..