उद्यापासून कुंभार समाज क्रिकेट स्पर्धा

गुहागर | प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवा आघाडी तर्फे कुंभार समाज प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा उद्यापासून दि. 22, 23 व 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा चिपळूण येथील पवनतलाव मैदान येथे खेळविण्यात येणार आहेत. तरी स्पर्धेसाठी उपस्थित राहून स्पर्धेचा उत्साह व शोधा वाढवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

या स्पर्धा युवा जिल्हाध्यक्ष श्री. महेश पडवेकर, युवा जिल्हा कार्याध्यक्ष श्री. पंढरीनाथ मायशेट्ये, युवा जिल्हा सचिव श्री.सुधीर जामसूतकर, खजिनदार श्री. प्रतिक साळवी व श्री संत गोरा कुंभार युवा आघाडी रत्नागिरी व सर्व संचालक यांच्या सहकार्याने भरविण्यात आल्या आहेत.