‘पोदार कणकवली’ मध्ये ‘दया भावनांचे तरंग’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिन’ चे आयोजन

कणकवली :       27 फेब्रुवारी रोजी असणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पार्श्वभूमीवर पोदार कणकवलीत विद्यार्थ्यांद्वारे मराठी भाषेचा गौरव करत भाषणे,कविता ,समूह गायन ,प्रश्नमंजुषा यांचे सादरीकरण करण्यात आले.शाळेच्या प्राचार्या सौ.स्वाती कणसे यांच्या हस्ते वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता चौथीतील आराध्य राज पाटील व प्रिशा मालंडकर या विद्यार्थ्यांनी केले.

तसेच समाजात गरजूंप्रति दया भावनेची जाणीव असणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व सांगत कणकवलीत पटकी देवी ते शिवाजी चौक पर्यंत रॅली काढत इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी ‘दयाभावण्याचे तरंग’या संकल्पनेवर पथनाट्य, गीत गायन व भाषण देत समाजाप्रती दया व मदतीची जाणीव निर्माण करणे किती गरजेचे आहे हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आला. त्याचबरोबर ‘पोद्दार वाॅलेंटीअर प्रोग्राम’अंतर्गत ‘पाणी वाचवा’ या विषयावर जनजागृती करत नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून कणकवलीचे वाहतूक निरीक्षक श्री. आर. के. पाटील यांचे सहाय्य लाभले. शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती कणसे यांच्या मार्गदर्शनीय व्यवस्थापनाखाली या उपक्रमांचे अत्यंत उत्तम अशा प्रकारे आयोजन करण्यात आले.