गावखडी व मालगुंड येथील समुद्री कासवांचे संवर्धनासाठी नवीन हॅचरीचीनिर्मिती

 

रत्नागिरी :रत्नागिरी वन विभागामध्ये वनपरिक्षेत्र रत्नागिरी अंतर्गत वन परिमंडळ पाली कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर समुद्री कासवांचे संवर्धनाचे काम मौजे गावखडी व मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर कासवांची अंडी हॅचरी मध्ये संवर्धित करुन त्यामधून निघणारी पिल्ले समुद्रात सोडण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. हे काम करीत असताना दि. १०.०२.२०२४ रोजी मौजे वरवडे रीळ येथे कासव घरटे मिळायची माहिती मिळाली त्याप्रमाणे जाऊन खात्री करता चार घरटी आढळूण आले सदरची घरटी त्याच ठिकाणी जाळी मारुन संवर्धित (Insitu) करण्यात आली आहे. दिनांक २३/०२/२०२४ रोजी मौजे भाटे येथील समुद्रकिनारी कासवाचे घरटे झाल्याबाबत माहिती मिळाली त्याप्रमाणे सदर कासवांची अंडी संख्या १४१ एवढीसंरक्षणासाठी गावखडी येथील हॅचरीमध्ये नेऊन सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर दिनांक २९/०२/२०२४ रोजी पुन्हा एकदा भाटे समुद्रकिनारी कासव घरटे आढळूणआल्याने गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन मौजे भाटे समुद्रीकिनारी नव्याने हॅचरीची निर्मिती करुन सदरचे कासव घरटे अंडी संख्या १०८ सुरक्षित संवर्धित केली आहे व सदर ठिकाणी कासव मित्र म्हणून श्री. समीर भाटकर यांची नेमणूक केलेली आहे.

 

सदरची कार्यावाही मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) वैभव सा. बोराटे व मानव वन्यजीव रक्षक निलेश बापट, परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार तसेच वनक्षेत्रपाल कांदळवन कक्ष रत्नागिरी किरण ठाकून यांचे मार्गदर्शनाखाली एन एस गावडे वनपाल पाली व मिताली कुबल वनरक्षक जाकादेवी, श्री.पी.एस. साबणे वनरक्षक रत्नागिरी कासवमित्र श्री प्रदिप हिंगणकर, श्री राकेश पाटील, श्री त्रषीराज जोशी, श्री समीर भाटकर हे करत आहेत. तरी यापुढे कुठल्याही समुद्रीकिनारी कासवांची घरटे आढळून आल्यास १९२६ या शासकीय टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा असे आव्हान परिक्षेत्र वनधिकारी रत्नागरी यांनी केली आहे.