न्हावेली l प्रतिनिधी :न्हावेली भटाचेटेब येथील ग्रामस्थांचे मागील कित्येक वर्षापासून सार्वजनिक ठिकाणी लाईटची मागणी होती. त्याच मागणीची दखल घेत मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर व आरती माळकर यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून सोलर लाइट ची मागणी केली . त्याचा पाठपुरावा करत अखेर मनसेचे राज्य सरचिटणीस संदीप दळवी यांच्या माध्यमातून सोलर लाइट मंजूर करण्यात आली. व त्याचा लोकार्पण मनसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत व जिल्हा-उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मनसे विभाग अध्यक्ष तथा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, न्हावेली ग्रामपंचायत सदस्य आरती माळकर, चेतन पार्सेकर, नवनाथ पार्सेकर, प्रथेमश नाईक, सत्यवान गावडे, अजय नाईक, समिर पार्सेकर, प्रसाद गावडे, दत्तप्रसाद पार्सेकर, राज धवन, अमोल पार्सेकर, दिपक बरकुटे, भूषण पार्सेकर, बंटी धवन, किशोर पार्सेकर, भावेश पार्सेकर, अजय पार्सेकर, धनेश नाईक, कुणाल पार्सेकर, ओमकार निर्गुण, बाळु सावळ ,राकेश न्हावेलकर, दिपक पार्सेकर, आदी मनसे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












