दहावीच्या विद्यार्थ्यांना एस.टी. बस चुकल्यास मोफत रिक्षाची सोय

 

शिरगाव (वार्ताहर)   सध्या दहावीची परिक्षा सुरु आहे.या परिक्षेसाठी शिरगाव परिक्षा केंद्राच्या कार्यश्रेञात येणा-या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर येताना एस.टी. बस चुकल्यास त्या विद्यार्थ्यांसाठी शिरगाव येथील रिक्षा चालक-मालक संघटनेकडून परिक्षा कालावधीत परिक्षा केंद्रावर येण्यासाठी मोफत रिक्षा प्रवासाची सोय करण्यात आली आहे.

याबाबत विद्यार्थी व पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.