तु. बा. कदम महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यशाळा संपन्न
खेड (प्रतिनिधी)महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तु. बा. कदम महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जागृती कार्यशाळेचे आयोजन समाजशास्त्र विभाग, महिला विकास कक्ष व आय क्यू ए सी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. “लिंगसमभाव आणि महिला” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्र. प्राचार्य जे. के. शेख, सौ. आरती नाईक, श्री. सचिन गोवळकर, श्री. संदीप गोवळकर, डॉ. एस. एस. खेडेकर. प्रा. व्ही. वाय. चोपडे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्घा टन समारंभानंतर दोन सत्र आयोजित करण्यात आली होती. पहिल्या सत्रात सौ. आरती नाईक यांनी मार्गदर्शन केले.
महिलांना समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीने सन्मान मिळाला पाहिजे. त्यासाठी पुरुषांनी आपली बहीण, आई, पत्नी यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला तरच खऱ्या अर्थाने समाजात लिंग समभाव जोपासण्यास मदत होईल.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचे ध्येय देवाधर्माला विरोध करणारे नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लढा देवाधर्माच्या नावावर सामान्य जनतेचे शोषण करणाऱ्या तसेच लुबाडणाऱ्यांच्या विरोधात आहे. समाजातल्या अंधश्रद्धा प्रबोधनाद्वारे दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोण रूजविणे आणि माणूसकीपूर्ण स्वातंत्र्य, समता माननारा व स्वीकारणारा आनंदी समाज निर्माण करणे हा भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धोरण आहे. समाजात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण बाळगण्याची खऱ्या अथनि गरज आहे त्याशिवाय समाजातील अघोरी कुप्रथांचा नायनाट होणे शक्य नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य महिला कार्यवाहक सौ. आरती नाईक यांनी केले.
ते तु. बा. कदम महाविद्यालयात आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन जागृती एक दिवसीय कार्यशाळेत उद्घाटक व बीजभाषक बोलत होत्या. याप्रसंगी सौ. आरती नाईक यांनी ज्ञान, विज्ञान, चिकित्सा, निर्भयता, आत्मविश्वास अशा मुददयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विविध वास्तव घटना सांगितल्या व संताच्या सुधारणावादी विचारांची बुद्धिवादी व विज्ञाननिष्ठ माहिती दिली. त्यांनी कुठलेही चमत्कार हे हातचलाखी असल्याचे सांगून चमत्कार करणारे हे सर्व ठग असतात असे स्पष्ट केले करून समाजातील वास्तवावर भाष्य केले.
दुसऱ्या सत्रात सचिन गोवळकर यांनी मार्गदर्शन करतांना अंधश्रद्धा निर्मूलचे महत्व प्रतिपादित केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. नीलेश जाधव यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून आयोजनाची भूमिका विशद केली व या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा स्वीकारावा असे आवाहन केले. कार्यशाळेचे सूत्र संचालन प्रा. नीलेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस. एस. खेडेकर यांनी केले.











