मुर्डेश्वर-सेनपुरा विभागादरम्यान ७ रोजी मेगाब्लॉक

 

 

खेड(प्रतिनिधी)मुर्डेश्वर-सेनपुरा विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ मार्च रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १२ वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक दुपारी ३ वाजता संपेल. या मेगाब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

 

 

१६५८५ क्रमांकाच्या सर एम. विश्वेश्वरया टर्मिनल बेंगळूर-मुर्डेश्वर एक्सप्रेसचा प्रवास ६ मार्च रोजी कुंदापुरा स्थानकापर्यंत कमी करण्यात आला आहे. कुंदापुरा-मुर्डेश्वर विभागादरम्यान अंशतः रद्द करण्यात आला आहे. १६५८६ क्रमांकाच्या मुर्डेश्वर-सर एम. विश्वेश्वरया टर्मिनल बेंगळूर एक्सप्रेसचा प्रवास ७ मार्च रोजी कुंदापुरा स्थानकापासून नियोजित वेळेत होईल.

मुर्डेश्वर-कुंदापुरा विभागादरम्यान अंशतः रद्द करण्यात आला आहे.

 

इन्नाजे- नंदीकूर दरम्यानही ७ रोजी दोन तासांचा ब्लॉक

 

इन्नाजे- नंदीकूर विभागादरम्यानही ७ मार्च रोजी सकाळी १२.१५ ते दुपारी २.१५ यावेळेत दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मालमत्ता देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार आहे. दोन तासांच्या ब्लॉकमुळे २२११४ क्रमांकाची कोच्युवेली-लोकमान्य टिळक टर्मिनस एक तासासाठी मंगळूर स्थानकात थांबवण्यात येईल. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.