शिवखुर्दतील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

 

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील शिवखुर्द येथील कार्यकर्त्यांनी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला, स्वप्निल नरळकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

प्रवेशकर्त्यांमध्ये अमित नरळकर, आर्यन नरळकर, आकाश नरळकर, सागर नरळकर, सुरज नरळकर, रामदास काणेकर, संदीप डफळे, विजय पाष्टे, तेजस डफळे, अनिकेत रसाळ, गितेश माळी, मनिष काणेकर, किशोर काणेकर, प्रफुल्ल माळी, संदेश भुवड, मंगेश नरळकर, नरेश काणेकर, सनी पांचाळ, विराज माळी, साहिल काणेकर, सौरभ नरळकर, संकेत पांचाळ, संदीप पाष्टे, प्रकाश काणेकर यांचा समावेश आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष ऋषीकेश कानडे, विभागप्रमुख जयेश गुहागरकर, पंकज पुळेकर उपस्थित होते.