खेलो इंडिया अंतिम तायक्वाँदो स्पर्धेसाठी सृष्टी पात्र

 

खेड(प्रतिनिधी) पाँडिचेरी येथे मिनीस्ट्री ऑफ युथ अफेअर्स, भारत सरकार यांच्या माध्यमातून तायक्वॉदो फेडरेशन ऑफ इंडिया व पाँडिचेरी तायक्वॉदो असोसिएशनच्या वतीने राजीव गांधी इन्डोर स्टेडीयमध्ये झालेल्या खेलो इंडिया वुमन्स तायक्वाँदो लिग फेज ३ स्पर्धेत तायक्वॉदो स्पोटर्स अकॅडमीची सृष्टी म्हशीलकर हिने कॅडेट ५९ वरील वजनीगटामध्ये कास्यपदक पटकावले. तिची ९ ते ११ मार्च रोजी ओडिसा-कटक येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

यशाबद्दल तायक्वॉदो स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी तायक्वॉदो स्पोट्र्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कररा, तालुका तायक्वॉदो स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष मिलिंद ईवलेकर उपाध्यक्ष विनय तोडणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक केले.प्रशिक्षक प्रशांत कांबळे, कोषाध्यक्ष व सहायक प्रशिक्षक तेजस भैरवकर यांचे मार्गदर्शन लाभले.