पुन्हा खोके म्हणाल तर महाराष्ट्रात तोंड वर काढू शकणार नाहीत : आदित्य ठाकरेंना इशारा
सेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी अकरा आमदार निवडून आणले
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज जगात गवगवा आहे. इतर देश त्यांचं मार्गदर्शन घेतात. एवढे मोठे नेते देशाचे पंतप्रधान आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु, संजय राऊत यांनी रोज सकाळी उठून त्यांच्याविरुद्ध सामनात लिहिणं व मिडीयासमोर येऊन बोलण हे योग्य नव्हत. कारण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने शिवसेना व भाजप युतीला मतदान करून बहुमत दिलं होत. यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडी निर्माण केली. हे आम्हाला मान्य नसल्याने आम्ही वेगळा निर्णय घेतला. सेनेतून बाहेर पडलेले पुन्हा निवडून येत नाहीत अशी भाषा केली जात आहे.
सेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणेंनी १२ पैकी ११ आमदार निवडणून आणले. ही कोकणी माणसाची ताकद आहे. त्यामुळे मान ठेवतोय तर तो मान घ्या. नाहीतर सगळं जनतेला सांगाव लागेल असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिला.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत
शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा येथील रवींद्र मंगल कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल करत मान ठेवतोय तर मान घ्या, नाहीतर सगळं जनतेला सांगाव लागेल असा इशारा दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत शिवसेना व भाजप युती सक्षम असल्याचे ठामपणे सांगितले.
यावेळी केसरकर म्हणाले, संपर्क प्रमुख रविंद्र फाटक हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळेल. पाच वर्ष अर्थराज्यमंत्री म्हणून राज्याच बजेट मांडल. मात्र, यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणला न्याय देण्यासाठी मला बजेट मांडायला संधी दिली त्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.आज राज्यात जनमताच सरकार स्थापन झालं आहे. तर खोक्याचा अर्थ काय, तुम्हाला पैसे आम्ही पुरविले. मी प्रॉपर्टी विकून पक्षाला पैसे दिलेत. आमच्या माजी मुख्यमंत्र्यांना काजू म्हणजे काय, बोंडू काय असतो ते माहीत नाही. कोकणावर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी अन्याय केलेला असताना मी सभागृहात बोलत असताना आदीत्य ठाकरे हसत होते. आम्ही तुमचा आदर ठेवतो. पण, तुम्ही आमच्यावर बोलत राहिला तर आम्हाला देखील बोलावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासोबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट झाली तेव्हा महाविकास आघाडी करून चूक केल्याच उद्धव ठाकरेंनी मान्य केल.राज्यात येऊन भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच त्यांनी सांगितल होत असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
तर माझा मतदारसंघात एका महिलेला घेऊन जयंत पाटील फिरत होते. हाच आमदारकीचा राष्ट्रवादीचा उमेदवार असल्याचं सांगत होते. यावेळी शिवसेनेचा आमदार टीकला पाहिजे असं उद्धव ठाकरेंना नाही वाटल. आदीत्य ठाकरे लहानपणापासून खोक्यांसोबत खेळले म्हणून खोके-खोके करतात. तर पुन्हा खोके म्हणाल तर महाराष्ट्रात तोंड वर काढू शकणार नाहीत. आम्ही कुणाकडून एक रूपया घेतलेला नाही. असेल तर ते सिद्ध करा, नाहीतर तुम्ही घेतले हे आम्ही सिद्ध करतो. प्रामाणिक मंत्र्यांना मंत्रीपद ठाकरेंनी का नाकारली याची कारणं सांगतली तर काय होईल याचा विचार करा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
चौकट
सिंधुदुर्गात भाजप व शिवसेना एकत्र काम करणार : रविंद्र फाटक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटना एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मुख्यमंत्री आणि मी एकत्र नगरसेवक होतो. शिंदे साहेब दिवसांतून २० तास काम करतात. सर्वसामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. आज रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याच लोकसभेच प्रमुख पद मला देण्यात आलं आहे. या संधीच सोन करेन, खेडला १९ तारीखला मुख्यमंत्री येत आहेत. त्यानंतरचा दुसरा मेळावा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल. भव्यदिव्य मेळावा करण्यास आमचा प्रयत्न राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप सोबत एकत्रित रित्या काम करू, असं मत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी व्यक्त केले.