दापोली | प्रतिनिधी: मिनिमहाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोली तालुक्यातील पर्यटकांची संख्या सध्या कमालीची घटल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दहावी व बारावीला परिक्षा सुरू असल्याने ही परिस्थिती असल्या हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. मात्र परिक्षा संपता पर्यटकांची चाहुल पुन्हा दापोलीत सुरू होतील असे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. सध्या दापोलीत पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. समुद्र किनाऱ्यांवर देखील पर्यटकांशी गर्दी घटली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक पर्यटकांच्या वाटेकडे डोळे लावून बसले असल्याचे पर्यटनक्षेत्रांमध्ये पहायला मिळत आहे. दापोलीत सध्या सुरमई, कोळंबी, पापलेट, बांगडे, किनला पर्यटकांशी मागणी आहे. त्याबरोबर मोदक, पुरणपोळी या पदार्थांत देखील अनेक पर्यटकांमधून मागणी होत आहे. तसे आता फणसभाजी देखील पर्यटकांना पसंतीस पडत आहे. मुरूड, कर्दे, लाडघर, पाळंदे, हर्णे या पर्यटनक्षेत्रांना अधिक पसंती लाभत असल्या पर्यटकांच्या गर्दीवरून स्पष्ट झालेले आहे.
दहावी बारावी परिक्षा झाल्यामुळे पर्यटनक्षेत्र शांत झालेले आहे. परंतु परिक्षा संपता पर्यटनक्षेत्र पुन्हा गजबजून जाईल असा विश्वास हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांना वाटत आहे. मार्च महिना हा परिक्षा महिना असल्याने एप्रिल ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पर्यटकांनी गर्दी दापोलीत दिसून येईल असे देखील पर्यटन क्षेत्रातून बोलले जात आहे.











