तळेबाजार बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामाविरोधात नागरिकांचे उद्या उपोषण

देवगड :देवगड – तळेबाजार येथील स्थानिक नागरिकांकडून तेथील अनधिकृत वडापावगाडी व पत्रा शेड बाबत नागरिकांना होणाऱ्या त्रसाबद्दल सदर ग्रां.प.मध्ये तक्रार अर्ज देण्यात आला होता.

 

व त्या बाबत तेथील स्थानिक नागरिकांकडून त्या विषयी २६ जाने.रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा हि देण्यात आला होता परंतु तळवडे ग्रां.पं. ने ७ दिवसात आपण वडापाव गाडी व पत्राशेड काडून टाकून कारवाई करतो असे लेखी हमीपत्र ग्रां.प.कडून देण्यात आले होते.

 

तरी आपण उपोषण ला बसू नये असे लेखी हमीपत्र देण्यातआल्या मुळे.सदर लेखी हमीपत्र ग्रा.प.कडून ग्रामस्थांना मिळाल्या मुळे ग्रामस्थांनी आपले उपोषण तात्पुरते स्तगित केले होते.

 

तसेच त्या नुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड यांच्या कडून सुद्धा सदर वाडापाव गाडी पत्रा शेडचे बांधकाम या रस्त्याच्या हद्दीत येत आहे.तसेच संदर्भिय शासन निर्णय क्र.४अन्वये व या कार्यालयातील मा उप अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयास सांक्षकित केलेल्या उपलब्ध ल्यांड प्लॅनप्रमाने सदर बांधकाम हे अनधिकृत होत आहे.

 

सदर पत्रा शेडचे बांधकाम हटविण्यासाठी संदर्भिय पत्र क्र.१,२, व ३अन्वये तेथील स्थानिक नागरिक हे दी.२६-१-२०२४ रोजी उपोषणास बसणार असल्याचे या कार्यालयास त्यावेळी कळविण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड कडून सदर वाडापाव गाडी पत्रा शेड कडून तकण्याबाबत ग्रां.पं. तळवडे ला सूचित करण्यात आले होते.

 

 

सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड कडून देखील या सदर ठिकाणी करणेत आलेले पत्रा

शेडचे अनधिकृत बांधकाम येत्या ७ दिवसात काडून टाकने बाबत संदर्भिय पत्र क्र.२ अन्वये ग्रामपंचायत कार्यालय तळवडे – बागतळवडे- तळेबाजार या कार्यालयास कळविले होते.

 

 

परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे येत्या ११ मार्च २०२४ रोजी तळवडे येथील ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसणार आहेत

सदर वडापाव गाडी पत्रा शेड हट वण्याचे आदेश सदर सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड कडून दिलेले असताना अद्याप का त्यावर कारवाई झाली नाही आहे.असे प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.

 

त्यामुळे कोणतीही कारवाई न झाल्यामुळे दिनांक २६ जाने.चे स्थगित उपोषण दिनांक ११ मार्च रोजी सदर नागरिकांनी पुकारले आहे.