माखजन ग्रा.पंचायत व शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश
माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातून माखजन बस स्थानकातून मिरज येथे जाण्यासाठी नवी बस सेवा सुरु झाली आहे.
ही बस दुपारी १.३०वाजता मिरज येथून सुटणार आहे.मिरज -सांगली- जयसिंगपूर-कोल्हापूर- बांबावडे- मलकापूर -आंबा- साखरपा- देवरुख -संगमेश्वर मार्गे माखजन अशी येणार आहे.तर माखजन बस स्थानकातून सकाळी ६.३० वाजता मिरज ला जाण्यासाठी मार्गस्थ होणार आहे.
पूर्वी माखजन कोल्हापूर बस सेवा अनेक वर्षे सुरु होती.परंतु मध्यंत्रीच्या काळात बंद झाली.या मार्गांवर बस सेवा पुन्हा चालू व्हावी यासाठी अनेक प्रयत्न सुरु होते.यासाठी आमदार शेखर निकम यांनी विशेष प्रयत्न् केले.तर ही बस सेवा सुरु करण्यासाठी स्थानिकांसह माखजन ग्रामपंचायतीने सातत्याने पाठपुरावा केला.सगळ्यांच्याच पाठपुराव्याला यश आले आहे.
ही बस सेवा सुरु झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
मिरज हून पहिल्या दिवशी माखजन ला बस आल्यावर जल्लोषात स्वागत झाले.तर दुसऱ्या दिवशी माखजन बस स्थानकातून मिरज साठी रवांना होताना श्रीफळ वाढवण्यात आले.यावेळी माखजन सरपंच चे महेश बाष्टे, संतोष पाडळकर, किशोर ताबंट, नितिन सागवेकर, मनोज दळी, रामचंद्र कदम, काका तांबे, कैलास कुंभार, संतोष गोटेकर, सुरेंद्र कोळबेकर, अनंत पाटगावकर, योगेश पेणकर, बारकु कदम, दिपक कुंभार, राम मोहिते, प्रतिभा चव्हाण, पुजा पवार आदी उपस्थित होते.












