घोगरेत २५ पासून जाखनवाडी चषक क्रिकेट स्पर्धा

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील घोगरे-जाखनवाडी येथील युवा प्रतिष्ठान जाखनवाडीच्या वतीने २५ ते २६ मार्च रोजी जाखनवाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्यास २५ हजार रूपये, उपविजेत्यास १५ हजार रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलदांज, उत्कृष्ट गोलंदाज यांनाही रोख रक्कम व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. २६ रोजी खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धा होतील. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुधीर शिंदे, आशिष जाधव, करण शिंदे, राज जाधव, दिलीप उपाले व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.