खेड(प्रतिनिधी) शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी येथील एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. एसटी प्रशासनाने लांबपल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या २६ नियमित फेऱ्यांसह ९ जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसचे आरक्षण देखील खुले झाले आहे.
२१ ते ३१ मार्च याकालावधीत ९ जादा बसेस धावणार आहेत. २१ मार्चपासून सकाळी ६.३० वाजता खेड-तुळशी- बोरिवली बसफेरी दुपारी ३ वाजता परतीला निघणार आहे. सकाळी ८.३० वा. खेड-विरार (रात्री ८.३० वाजता. परत), सकाळी ९.३० वा. खेड-बोरिवली (रात्री १० वा. परत), सकाळी १० वा. खेड-तुळशी विठ्ठलवाडी (रात्री ९.३० वा. परत), सकाळी १०:३० वा. खेड-भांडूप (रात्री ८.४५ वा. परत), सकाळी ११ वाजता खेड-बोरिवली (रात्री १० वा. परत), दुपारी १.१५ वा. खेड-ठाणे (रात्री १०.३० वा. परत.), दुपारी २.३० वा.खेड-स्वारगेट (रात्री १०.३० वा. परत) रात्री ९.३० वा. खेड-बोरिवली दुसऱ्या दिवशी परतीला निघून सकाळी ८.३० वाजता येथील स्थानकात दाखल होईल.
मागणीनुसार ज्यादा फेऱ्या शिमगोत्सवातील गर्दीची तीव्रता लक्षात घेता चाकरमान्यांच्या सुरक्षित सेवेसाठी एसटी आगार पूर्णपणे सज्ज असून नियमित फेऱ्यांसह जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवाशा- कडून जादा फेऱ्यांसाठी मागणी वाढल्यास मागणीनुसार आणखी एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.अशी माहिती आगारप्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी दिली










