खेड(प्रतिनिधी) येथील शिक्षक प्रबोध जनार्दन चव्हाण हे एम.ए.शिक्षणशास्त्र पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या बद्दल त्यांचा प्राथमिक शिक्षक पतपेढीकडुन सन्मान करण्यात आला
चव्हाण हे जि.प.शाळा धामणदीवी नं.१ येथे कार्यरत असून त्यांनी य.च.म.मुक्त विद्यापीठ, नाशिक या विद्यापीठाची एम.ए.शिक्षणशास्त्र पदवि प्रथम श्रेणीत ऊत्तीर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वतीने त्यांना शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला खेड तालुक्यातील सर्व शिक्षक वर्ग तसेच पतपेढीचे संचालक ,मान्यवर उपस्थित होते.प्रबोध चव्हाण हे खेड तालुक्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.मुक्त विद्यापीठाबद्दल त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी त्यांचे पालक यांना माहिती दिल्यामुळे ज्यांनी सातवी ,दहावी बारावीनंतर शिक्षण थांबवले होते त्यांनी प्रबोध चव्हाण यांच्याकडून प्रेरणा घेऊन दहावी ,बारावी ,तसेच ग्रॅज्युएशनपोस्टग्रॅज्युएशन व व्यावसायिक शिक्षण घेऊन प्रगती केली आहे.प्रबोध चव्हाण हे त्यांचे प्ररणास्थान ठरले आहेत.
दरम्यान नुकताच त्यांना अविष्कार सोशल अॅन्ड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापुर (भारत) या संस्थेच्या क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.२०१४ ला विश्वसमता कलामंच संगमेश्वर रत्नागिरी चा संस्थेने त्यांना राज्यस्तरिय प्रज्ञागौरव पुरस्काराने सन्मानित केले.त्यांनी वेगवेगळ्या निबंध स्पर्धांसाठी निबंध लेखन केले आहे.











