लांजा नं.5 शाळेमध्ये “बालआनंद मेळावा” उत्साहात साजरा.

मुलांना प्रत्यक्ष व्यवहारातून शिक्षण मिळावे या उद्देशाने आयोजन

लांजा (प्रतिनिधी ) मुलांना प्रत्यक्ष व्यवहारातून शिक्षण मिळावे, मिळविलेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग कसा करायचा, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, हा दृष्टीकोन ठेवून शुक्रवारी १५ मार्च रोजी जि. प. पूर्ण प्रा. शाळा लांजा नं.5 शाळेमध्ये बालआनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते.
या बालआनंद मेळाव्याचे उदघाटन शा. व्य. समितीचे अध्यक्ष दिलीप चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले … या बालआनंद मेळाव्यात इ.3री ते 8वी पर्यंत च्या वर्गाचे प्रत्येकी 2 स्टॉल लावण्यात आले होते… यामध्ये भडंग, लिंबू सरबत, गोबी मन्चुरिअन, सुकी भेळ, ओली भेळ, कैरी, ज्यूस , पाणीपुरी, , कलिंगड स्लाईस, फ्रुट सॅलड, कोकम सरबत, लिंबू सोडा, कैरी, पेरू, वडापाव इ. चे स्टॉल लावण्यात आले होते… आमचेच पदार्थ किती छान आहेत, हे सांगणारे पोष्टर व जाहिरात पाहून मुलांच्यामधील creativity सगळ्यांना पाहायला मिळाली. सर्व मुलांनी मनोसक्त खाण्याचा आस्वाद घेतला.

शाळेतील ५५० मुलांना व्यवहार कसा करावा, पैसे मोजून देणे व घेणे, आपले पैसे जपून ठेवणे, आपला खाऊ व्यवस्थित कसा ठेवावा, व्यवसाय करताना कोणती काळजी घ्यायला लागते यासारखे अनेक अनुभव प्रत्यक्ष मुलांना मिळाले.. सहकार म्हणजे काय? सहकारी संस्था कसे भांडवलं गोळा करतात, कसा उद्योग उभा करतात हें बालआनंद मेळाव्यामुळे समजून सांगायची गरज लागली नाही…या मेळाव्यामुळे खरेदी,विक्री, नफा या संकल्पना मुलांच्या स्पष्ट होण्यास मदत झाली
. सर्वच मुलांनी नफाचं कमावला हें या बालआनंद मेळाव्याचे खास वैशिष्ट्य….या बालआनंद मेळाव्यामध्ये 50,000 च्या वर उलाढाल झाली.बालआनंद मेळाव्यामध्ये अनेक ठिकाणी विखुरलेला कचरा गोळा करून माझी शाळा, स्वच्छ,सुंदर शाळा असल्याचेही मुलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले…
दुपारच्या सत्रात मुलांसाठी फनी गेम्स चं आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बादलीमध्ये चेंडू टाकणे ,रुमाल उचलणे, बाईला टिकली लावणे,ओळखा पाहू, फुगा फुगवून ग्लास उचलणे,एका माचीस च्या काडीने मेणबत्या पेटविणे, ओळखा पाहू, ग्लास चा टॉवर बनविणे यासारखे अनेक फनी गेम्स चा आनंद मुलांसह शाळेतील सर्व शिक्षकवृंदानी घेतला..त्याचबरोबर सर्व मुलांनी संगीत खुर्चीचा आनंद घेतला..

मुलांना शिक्षणाबरोबरच व्यवहारज्ञान मिळावे, आनंद मिळावा, खेळातून शिक्षण मिळावे या हेतूने आजचा बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता, आणि तो उद्देश सफल झाल्याचे मुलांच्या चेहऱ्यांवरून दिसत होते … असे सहशालेय उपक्रम नेहमी शाळेत राबविले जातात, त्यामुळे आमच्या मुलांचा सर्वांगीण विकास होत आहे अशा अनेक प्रतिक्रिया पालकांनी दिल्या…

या बालआनंद मेळाव्याला शा. व्य.समिती सदस्य, माता पालक समिती सदस्य,शिक्षक पालक समिती सदस्य, पत्रकार संतोष कोत्रे व संजय साळवी तसेच अनेक पालकांनी भेट देऊन, प्रत्यक्ष खरेदी करून मुलांचा उत्साह वाढविला… हा बालआनंद मेळावा शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला.