माखजन |वार्ताहर : चिपळूणातील लक्ष्मी नारायण मंदिर नजीक राहणारे वसंत बाळकृष्ण चितळे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.ते ९४ वर्षांचे होते.
शालेय शिक्षण चिपळूणातील युनायटेड इंग्लिश स्कूल येथे झाले तर त्यांची नोकरी मुंबई विद्यापीठात झाली.वाचनाची आवड असल्याने विविध विषयांचे ज्ञान त्याना अवगत होते.सर्वांशी मिळून मिसळून राहत असल्याने त्यांच्या निधानाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पुतण्या,नातवंड असा परिवार आहे.











