मात्र वेबसाईट हॅक झाल्याची चर्चा
रत्नागिरी | प्रतिनिधी : एसटी महामंडळाच्या बसेसचे ऑनलाईन आरक्षण करणारी वेबसाईट सकाळपासून बंद होती. यामुळे ग्राहकांची गैरसोय होतं होती. यातच महामंडळाची रत्नागिरीची वेबसाईट हॅक झाल्याचे सांगण्यात येतं होते.
मात्र या सर्व गोष्टींचा एसटीच्या रत्नागिरी विभागाने इन्कार केला असू न वेबसाईटचा सर्वर सकाळी 8 वाजल्यापासून डाऊन होता, मात्र सकाळी 10 वाजल्यापासून साईट पुन्हा ऑन झाल्याचे एस्टीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.