फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये “ ग्रंथ प्रदर्शन “ संपन्न

 

रत्नागिरी : फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेण्ट अँड टेकनॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत दिनांक २० व २१ मार्च २०२४ रोजी “ ग्रंथ प्रदर्शन ” आयोजित करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना ग्रंथालयात येणाऱ्या नवनवीन वाचन साहित्याची माहिती व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची अभिरुची निर्माण व्हावी हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश होता. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक २० मार्च २०२४ रोजी फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी फिनोलेक्स ॲकॅडमीच्या ग्रंथालय समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश गजमल व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

या ग्रंथ प्रदर्शनात अभियांत्रिकीच्या सर्व विषयांची पुस्तके, स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तके ठेवण्यात आली होती. या प्रदर्शनाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश गजमल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी ग्रंथपाल श्री. महेश भिडे, तसेच सहाय्यक ग्रंथपाल श्री. विनय कीर व ग्रंथालय सहाय्यक श्री. सुहास रावणंग यांनी विशेष मेहनत घेतली.