आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेला हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड(विवो) पुणे कडून सामाजिक बांधिलकी प्रकल्पांतर्गत ऑडिओलॉजी सेटअप साहित्य अर्थात श्रवण क्षमता चाचणी उपकरणे आज प्रदान करण्यात आले. या प्रसंगी श्रवण क्षमता तपासणी कक्षाचे उदघाट्न हिसोआ चे एच आर मॅनेजर श्री.सौम्या बक्षी यांच्या हस्ते झाले. या ऑडिओलॉजि सेटअप मुळे जन्मजात श्रवणदोष असलेल्या बालकांपासून ते सर्व वयोगटामधील श्रवण दोष असणाऱ्यांसाठी श्रवण क्षमता चाचण्या आस्था थेरपी सेंटर, परकार हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर येथे उपलब्ध होतील .यामुळे श्रवण बाधित दिव्यांगांच्या पुनर्वसन कार्याला गती मिळेल. या कार्यक्रमाला उर्मी संस्था पुणे चे श्री. दिलीप तिडके, हिरानंदानी हॉस्पिटलच्या ओडिओलॉजिस्ट श्रीम. प्राजक्ता भोगटे, कॉक्लेअर च्या स्वाती शेनॉय, हिसोआ चे रोहित वाकळे, सागर घाडगे, मुकेश हातीसकर, शिशिर रावनंग, सिद्धेश ठाकूर, समीर गांधी उपस्थित होते.या देणगी साठी आस्थाच्या वतीने सुरेखा पाथरे,साक्षी चाळके,संकेत चाळके,संपदा कांबळे यांनी देणगीदारांचे आभार मानले.या कार्यक्रमाला मोठया संख्येने पालक, मुले उपस्थित होते.











