रत्नागिरी ः प्रतिनिधी :शहरानजीकच्या एमआयडीसी येथील कंचन हॉटेल बाहेरील सार्वजनिक रस्त्यावर दारु पिणार्या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार 24 मार्च रोजी दुपारी 12.45 वा. करण्यात आली.
कुंदन नंदकुमार चव्हाण,विशाल दत्ताराम कांबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही रविवारी दुपारी कंचन हॉटेल समोरील सार्वजनिक रस्त्यावर दारु पिण्याचा परवाना नसताना पुढ्यात दारुचीद बाटली ठेवून पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे










